Monday, April 20, 2026
Homeबल्लारपूरसार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह ठरतेय अय्याशिचे माहेरघर
spot_img

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह ठरतेय अय्याशिचे माहेरघर

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह ठरतेय अय्याशिचे माहेरघर

श्रेयश वानखेडे:

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह सध्या अराजक घटकांचासाठी अय्याशिचे सुरक्षित स्थान म्हणून नावारुपात येत असल्याचे चित्र आहे.परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच उघड्यावर दर्शनार्थ ठेवल्याचे चित्र येथे प्रत्येकाला अनुभवता येतो.

यासंदर्भात अधिक माहिती मिळवली असता असे निदर्शनास आले की भाजपच्या एका बड्या नेत्याच्या नियंत्रणात असणारी मजूर सहकारी संस्थेच्या नावाने सदर विश्रामगृहाचे व्यवस्थापन अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे  कोणत्याच अधिकाऱ्यांच्या  नियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभाग  राहिला नसल्याचे सध्याचे चित्र आहे.ज्या अधिकाऱ्यांकडे याचा कारभार आहे.त्या अधिकाऱ्यांनाही काही लोक जुमानत नसल्याचे कळते तर   काही राजकीय पुढारीही तेथे फक्त अय्याशीसाठी येत असतात येथील ठेकेदाराच्या बेजबाबदार पणाचा अनुभव एका आमदारांना घेतला असून त्यावेळी शहरातील काही पत्रकारही तेथे उपस्थित होते.याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांने सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपूरच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना केली होती परंतू त्याचा काही एक फायदा झाला नाही उलट परिस्थिती पुन्हा विदारक झाली असून  विश्रामगृहाच्या देखभाली कडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे .स्वच्छ पिण्याच्या पाणीसाठी असलेले संयंत्र कित्येक महिन्यापासून नादुरुस्त आहे. व कंत्राटाप्रमाणे कोणतीच व्यवस्था तिथे उपलब्ध होत नाही ही सर्व बाब अधिकाऱ्यांना माहिती असताना देखील केवळ नेत्याच्या दबावाखाली सर्व सोसले जात असल्याचे कळते.तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने विश्रामगृहाचे नियम धाब्यावर ठेवून अनेक शासकीय अधिकारी शासकीय निवासस्थानाप्रमाणे येथे एक एक महिना वास्तव करीत असल्याचे कळते.

नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून या विश्रामगृहाची नव्याने निर्मिती करण्यात आली त्यांच्या विकास पुरुष म्हणून असलेल्या प्रामाणिक प्रतिमेला मात्र त्यांचेच जवळचे लोकं मलीन करत असल्याची येथे चर्चा आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page