Saturday, May 2, 2026
HomeEducationगुरुनानक महाविद्यालयाने मेरिटची परंपरा राखली
spot_img

गुरुनानक महाविद्यालयाने मेरिटची परंपरा राखली

गुरुनानक महाविद्यालयाने मेरिटची परंपरा राखली

श्रेयश वानखेडे:
स्थानिक गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. कुसदिया  सिद्दिकी हिने रसायनशास्त्र  पदव्युत्तर परीक्षेत गोंडवाना विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुरुनानक महाविद्यालयाने मेरिटची परंपरा अखंड सुरू ठेवल्याने शहरातील महाविद्यालय कौतुकाचा विषय ठरले आहे. सत्र 2023 -24 च्या गुणवंताच्या यादीत कु. सिद्धिकेचे नाव झळकल्याने तिचा महाविद्यालयात गौरव चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी. एम. बहिरवार तर प्रमुख अतिथी म्हणून जीव रसायनशास्त्र प्रमुख डॉ. जी. एस .गोंड, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वाय. जी .बोडखे ,डॉ.ज्योत्स्ना खोब्रागडे होते. सत्कार प्रसंगी डॉ.बहिरवार म्हणाले,” स्पर्धेच्या युगाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व द्यावे. जिद्द आणि चिकाटी यातूनच स्वतंत्र अस्तित्व निर्माण होत असते.” डॉ. दिनेश देशमुख, डॉ.ज्योत्स्ना खोब्रागडे ,डॉ.निलेश जाधव ,डॉ. वाय जी.बोडखे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनल गेडाम यांनी केले तर आभार डॉ. मनीषा जीवतोडे यांनी केले. याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्गाची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page