Tuesday, December 9, 2025
HomeSpardhaवैष्णवी व शादाब यांची विद्यापीठ राष्ट्रीयस्तरावर कबड्डी मध्ये निवड
spot_img

वैष्णवी व शादाब यांची विद्यापीठ राष्ट्रीयस्तरावर कबड्डी मध्ये निवड

वैष्णवी व शादाब यांची विद्यापीठ राष्ट्रीयस्तरावर कबड्डी मध्ये निवड

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर चे शादाब व वैष्णवी या खेळाडूची विद्यापीठच्या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कबड्डी संघात निवड झाली आहे.
      महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचा मुलींचा संघ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरली असून त्या संघातील कु. वैष्णवी मेश्राम हिची अमरावती विद्यापीठ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील  पश्चिम क्षेत्राच्या मुलीच्या कबड्डी स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. तसेच राजस्थान येथील झुंझुनू विद्यापीठ होणाऱ्या मुलांच्या कबड्डी स्पर्धेत शादाब  शेख याची गोंडवाना विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
    महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर , प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, शारिरीक शिक्षण विभागाचे प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर सह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कु. वैष्णवी मेश्राम व शादाब शेख यांना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page