ट्रॅव्हल्स कडून होत आहे प्रवाशांची लूट : चंद्रपूर-पुणे भाडे वाढविले तीन पट
श्रेयश वानखेडे:
दिवाळीच्या काळात एसटी आणि रेल्वेत जागा मिळत नसल्याने खाजगी बस चालक त्याचा गैरफायदा घेत आहे. परिवहन विभागाच्या नियमा प्रमाणे एसटी तिकीट दराच्या तुलनेत ५० टक्के अधिक दर घेण्याची मुभा खाजगी बसचालकांना आहे. मात्र प्रत्यक्षात एसटीच्या तुलने दुप्पट तर काही वेळा तिप्पट दर आकारला जात असल्याच्या प्रवाशाच्या तक्रारी आहे. या मध्ये विशेष करून पूनेला शिक्षण घेणारे विद्यार्थी भरडले जात आहे. परंतु याकडे आरटीओ कडून दुर्लक्ष केले जात आहे. दिवाळी संपल्यानंतर शिक्षण व नोकरीवर विद्यार्थी व नागरिकांची संख्या मोठी असते याचाच फायदा घेवून खाजगी ट्रॅव्हल्स चालक चंद्रपूर-पुणे जाणाऱ्या प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीत संपल्यावर परतीच्या प्रवास दर जवळपास तिप्पट होतात. यावेळी दिवाळीपूर्वी भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.सध्या चंद्रपूर-पुणे २५०० पासून ते ३५०० रुपया पर्यंत आकारले जात आहे.
बुकिंग फुल्ल दिवाळीच्या वेळी अतिरिक्त खाजगी बस धावतात. अनेक संचालक बसेस दुसऱ्यांकडून भाडेतत्वावर घेतात. मोबाईल ॲपवर दाखवेलेली बस ऐवजी दुसरीच बस पाठवतात व अशा बसेस ॲपवर आपल्याच एजंट कडून तिकीट बुक करून त्या प्रमाणे दर्शवून ती फुल्ल झाल्याचे दर्शवतात. त्यानंतर वेळेवर येनाऱ्यां प्रवाशांकडून काळाबाजार करून जादा दराने रोखीने पैसे घेवून अवास्तव रक्कम आकारली जाते असा आरोप प्रवाशांनी केला आहे.