Sunday, April 19, 2026
HomeCrimeशंकरपुरच्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड: ३ लाख ७७ हजाराचा रुपयाचा मुद्देमाल...
spot_img

शंकरपुरच्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड: ३ लाख ७७ हजाराचा रुपयाचा मुद्देमाल जप्त

शंकरपुरच्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड: ३ लाख ७७ हजाराचा रुपयाचा मुद्देमाल जप्त 

श्रेयश वानखेडे: 
स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस स्टेशन भिसी  हद्दीतील शंकरपूर येथे ५२ तासपत्ते जुगार अड्यावर छापा मारून ७ जणांना अटक करत ३ लाख ७७ हजर रुपयाचा मुद्देमाल जप्त केले.
      दि. १ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रात्रौ पोलीस स्टेशन भिशी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की,  मौजा शंकरपूर शेत- शिवारात काही इसम ५२ तासपत्ते जुगार खेळ खेळत आहे, अशी खात्रीशीर माहीतीवरुन मौजा शंकरपुर शेत शिवारात जुगार रेड करून अखिल गुलाबराव मुनघाटे वय ३९ वर्षे रा . हिरापुर ता. चिमूर व ईतर 6 इसमांना जागेवर पकडुन ७ व ईतर इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून जुगारातील नगदी ४१,५०० रुपये, ५ मोटर सायकल व ईतर साहित्य कि. ३,३६,३०० रुपये असा एकूण ३,७७,८०० रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त करण्यात आला.
        आरोपी विरुध्द पो.स्टे.भीसी येथे कलम १२ (अ ) म.जु.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक काँक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार,पोलीस उपनिरीक्षक संतोष निभोरकर, पो हवा.  किशोर वैरागडे, रजनीकांत पूठावार, नापोअ संतोष येलपूलवार पो.आ गोपाल आतकुलवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page