दिवाळीच्या पूर्वसंध्येला विसापूर येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पिकाला पाणी देताना लागला वीज करंट
श्रेयश वानखेडे:
तालुक्यातील विसापूर येथील शेतकऱ्याची राजुरा तालुक्यात गोयगाव येथे शेत जमीन आहे. रब्बी हंगामातील शेत पिकाला पाणी देण्यासाठी तो बुधवार दि. 30 रोजी दुपारी गेला. शेत पिकाला पाणी करत असताना विद्युत प्रवाहाच्या तीव्र धक्याने त्याचा शेतशिवाराच मृत्यू झाला. ही घटना दि. 31 रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला विसापूर येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक शेतकरी मारोती सुधाकर टोंगे वय ५१ वर्ष रा.विसापूर ता.बल्लारपूर असे नाव आहे. त्याच्या पश्चाताप पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
मृतक शेतकरी मारोती टोंगे यांना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर व राजुरा तालुक्यात गोयगाव येथे शेत जमीन आहे. त्याने खरिप हंगाम घेऊन रब्बी हंगामाची तयारी केली होती. बुधवारी मारोती हा राजुरा तालुक्यातील गोयगाव येथील शेतशिवारात रब्बी हंगामासाठी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेला.शेताला पाणी करत असताना त्याला विजेचा जबरदस्त करंट लागला. करंट लागताच त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
पती शेताला पाणी देण्यासाठी राजुरा तालुक्यातील गोयगाव येथे गेला.मात्र, रात्र होऊन देखील तो घरी परतला नाही. यामुळे त्याच्या पत्नीने गोयगाव येथील नातेवाईकांकडे चौकशी केली. त्यावेळी मारोती टोंगे हा शेतातील मोटारपंप जवळ मृताव्यथेत आढळून आला. शेतात पिकाला पाणी देताना विजेचा करंट लागून त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे कुटुंबावर आघात झाला आहे. त्याच्या कुटुंबाला दिवाळी सणाच्या आनंदावर विरजन पडले आहे. मारोती टोंगे याच्या अकाली अपघाती मृत्यूने गावातील वातावरण शोक मग्न झाले आहे.
घटनेचा अधिक तपास राजुरा पोलीस करत आहे.