Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeEducationमोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ' बाल दिवस'...

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘ बाल दिवस’ साजरा

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘ बाल दिवस ‘ साजरा

श्रेयश वानखेडे:

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे  दिनांक 14/11/2024 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ही ‘बाल दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या मा. अस्मा खलीदी मॅडम या अध्यक्ष म्हणून तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ. भावना दुबे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कुमारी ईश्वरी बल्की या विद्यार्थिनीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून माहीती समजून दिली, तर कुमारी निधी ठाकूर या विद्यार्थिनीने त्यांच्या कामाचे महत्त्व पटवून दिले व जीवनचरित्रावर काव्य वाचन घेण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या अस्मा खलिदी मॅडम यांनी विद्यार्थिनींना वेळेचे महत्व व नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी मुस्कान शिल्पे वर्ग 10 वा या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन कुमारी श्रावणी बोरकर वर्ग दहावा या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक गण व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page