Wednesday, September 2, 2026
spot_img
HomeEducation*शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला कॉन्व्हेंट शिक्षकांचे धरणे आंदोलन*

*शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला कॉन्व्हेंट शिक्षकांचे धरणे आंदोलन*

*शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला कॉन्व्हेंट शिक्षकांचे धरणे आंदोलन*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक 4 सप्टेंबर 2026 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद समोर दुपारी 3  ते 5 या वेळात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागातर्फे , महाराष्ट्र शासन शालेय विभाग व शिक्षण विभाग चंद्रपूर यांना कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्न बाबत अनेकदा अवगत केले.
 संघटनेने आतापर्यंत कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी अनेकदा प्रशासनाला निवेदने, मोर्चे, भजन आंदोलन, मुंडन आंदोलन करून आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला आहे . कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात प्रशासन व शासन सहकार्य करीत नसल्यामुळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे शासनाला व संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात आणून देण्याकरिता व शिक्षकांच्या न्याय मागणीसाठी दिनांक 4 सप्टेंबर 2026 दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्रांगणात पुन्हा शांततेत धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
 *कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांच्या प्रमुख मागण्या.* 
शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शालेय कायदा MEPS 1977 व नियमावली 1981 नुसार पूर्ण वेतन, नियुक्तीपत्र, सर्विस बुकची प्रत,CL,EL, मा. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सुट्ट्या, कामाचे तास, महिलांना प्रसूती पूर्व वेतनासह रजा, वेतनातून भविष्य निर्वाह निधीची नियमानुसार कपात, ग्रॅच्युईटी निधी, तथा इतर नियमात निर्देशित लाभ  मिळावे व राज्यात सुरू असलेल्या सर्व कॉन्व्हेंट शाळांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्या आर्थिक व प्रशासकीय बाबीची माहिती जनतेला पाहण्याकरिता शालेय वेबसाईटवर टाकावी, दोशी संस्थाचालक व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागण्यांचा समावेश आहे.
वरील आंदोलनाची रुपरेषा आपल्या माहितीस्तव सादर करीत आहे.
आपला नम्र
विवेक आंबेकर
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग
Mob.9970381516
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page