Sunday, December 7, 2025
Homeबल्लारपूरवाराबुकी ची शिकार करणाऱ्याला वन विभागाने केले गजाआड
spot_img

वाराबुकी ची शिकार करणाऱ्याला वन विभागाने केले गजाआड

वाराबुकी ची शिकार करणाऱ्याला वन विभागाने केले गजाआड

श्रेयश वानखेडे:

                वाराबुकी हा पक्षी 40 मैल प्रति तास वेगाने उडणारा पक्षी म्हणून त्याची ओळख असून निसर्ग चक्रातील हा पक्षी महत्त्वाचा घटक आहे. सदर पक्षीची अवैधरीत्या शिकार करून त्याची विक्री करीत असल्याचे गुप्त माहितीचे आधारे दिनांक: 25 नोव्हेंबर 2024 ला रात्रो 7.00 वाजताचे सुमारास विसापूर टोल नाका परिसरात सापडा रचून आरोपी नामे संजय दादाजी नाने वय 33 वर्ष राह. विसापूर याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीची झडती घेतली असता आरोपी जवळ मृता अवस्थेत असलेले वर नमूद पक्षी मोक्यावर आढळून आले. त्यानंतर आरोपीचे घरी जाऊन अधिक झडती घेतली असता, घरी सुद्धा जिवंत असलेले वाराबुकी पक्षी व गुन्ह्यात वापरलेले साहित्य आढळून आले.
       आरोपीची अधिक चौकशी केली असता वर्धा नदीपात्रातून वर नमूद पक्षी जाळीच्या सहाय्याने पकडून त्यांची विक्री करीत असल्याचे आरोपीने कबुली दिली. त्याअनुषंगाने आरोपी विरुद्ध वन्यप्राणी (संरक्षण ) अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39, 44, 49(  B) ,50, 51 अन्वये वनगुन्हा क्र. दिनांक: 25.11.2024 जारी करण्यात आला असून
वनगुन्ह्यात वापरण्यात आलेले 1 मोटर सायकल व आरोपीच्या घरून गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.
         सदर कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे व WPSI चे प्रतिनिधी श्री. मुकेश भांदकर, यांचे उपस्थितीत क्षेत्र सहाय्यक श्री.  कोमल घुगलोत, वनरक्षक कुमारी वर्षा पिपरे, श्री. सुधीर एम. बोकडे, श्री. अनिल बी. चौधरी व  संरक्षण मजुर श्री. नितेश बावणे यांनी आरोपीला पकडण्यात सहकार्य केले. सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर चे उपवनासंरक्षक  श्रीमती श्वेता बोड्डू व सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहे.
                   वाराबुकी पक्षी ची नदीपात्र किंवा तलाव परिसरात शिकार होत असल्याचे माहिती मिळाल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे. शिकार्याविरुद्ध  कायदेशीर कार्यवाही  करण्यात येईल.  असे आवाहन श्री. नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह( भ्रमणध्वनी क्रमांक: 8668259217) हे करीत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page