Thursday, July 30, 2026
spot_img
Homeबल्लारपूरजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली कार्यक्रम

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली कार्यक्रम

श्रेयश वानखेडे:

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. आर. के. वानखेडे ज्येष्ठ शिक्षक तर प्रमुख पाहुणे श्री. यु. के. रांगणकर सर, श्री. आर. बी. अलाम सर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रथमत: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनी  त्रिशाली महानंद, रूपाली निमकर, अवनी पेटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त  तसेच त्रिशाली महानंद व रुपाली निमकर यांनी संयुक्तपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीत सादर करून आदरांजली वाहिली.
आपल्या प्रास्ताविकात श्री. आर. बी. अलाम यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  शिक्षणातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखविला. शिका, संघठित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला.
प्रमुख पाहुणे श्री. यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, पुस्तक आपल्याला घडविते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवले पाहिजे.
अध्यक्षीय भाषण श्री. आर. के. वानखेडे  ज्येष्ठ शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. बी. अलाम, संचालन सौ. एस. एन. लोधे मॅडम, आभार श्री. एस. एम. चव्हाण सर यांनी केले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. जगदीश कांबळे, श्री. वामन बोबडे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री इंद्रभान अडबाले तसेच विद्यार्थीगण  उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page