Monday, September 14, 2026
spot_img
HomePunyatithiमहात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व सांस्कृतिक विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना...

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व सांस्कृतिक विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात इतिहास व सांस्कृतिक विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Shreyash Wankhede:

बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 6 डिसेम्बर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम पार पडला महाविद्यालयाच्या इतिहास व सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ रजत मंडल महात्मा फुले महाविद्यालय, डॉ. किशोर चौरे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाला लाभलेला असा अनमोल हिरा असून ज्यांनी या देशाचं भूतकाळचं काय तर वर्तमान व भविष्याविषयींची तरतूद केली तसेच भारतीय संविधानाच्या माध्यमातून दलित सोशित, पीडिताच्या अधिकाराचे रक्षण केले. ” या कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर चौरे तर आभार प्रदर्शन प्रा. दिवाकर मोहितकर यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. रोशन फुलकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. दिपक भगत, प्रा. राजेंद्र साखरे, यांच्यासह प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page