Friday, May 1, 2026
HomePoliticalपोंभुर्णा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
spot_img

पोंभुर्णा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

पोंभुर्णा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

चंद्रपूर जिल्हा हा निरोगी करण्यासाठी विविध शिबिराचे आयोजन करणे हे एकच लक्ष -मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव हा सुदृढ असावा हे सुधीर भाऊ चे लक्ष :  डॉ. मंगेश गुलवाडे

Shreyash Wankhede:
भव्य वैद्यकीय व दंत आरोग  शिबिर पोंभूर्णा     ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर आदिवासी जनतेला तालुकास्तरावर तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने दिनांक ११ मार्च २०२४ ला सार्वजनिक आरोग्य विभाग चंद्रपूर, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण रुग्णालय पोभुर्णा येथे भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटक मा.नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य व मस्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या हस्ते दूरचित्रवाणी द्वारे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्रीमती सुलभाताई पिपरे नगराध्यक्ष नगरपंचायत पोंभूर्णा यांनी भूषवले. विशेष अतिथी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अशोक कटारे, डॉ. मंगेश गुलवाडे महासचिव चंद्रपूर जिल्हा ग्रामीण  (भाजप), मा. श्री विनोद देशमुख माजी नगराध्यक्ष पोंभूर्णा मा. श्रीमती अलकाताई आत्राम माजी सभापती पंचायत समिती पोंभूर्णा ,मा. श्री अजय मस्के सदस्य रुग्ण कल्याण समिती, ग्रामीण रुग्णालय पोभुर्णा ,मा. श्री सागर जी खडसे मा. मंत्री यांचे वैद्यकीय प्रतिनिधी (भाजप), मा. श्री सचिन  धोंडरे मा. मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी (भाजप),डॉ. भास्कर सोनारकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सा. रु. चंद्रपूर ,मा. श्री शिवाजी कदम तहसीलदार पोंभूर्णा, मा श्री संजय सिंह पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पोंभूर्णा, मा. श्री विकास चिडगलवार मुख्याधिकारी नगरपंचायत पोंभूर्णा , मा. श्री अरुणराव चनफने संवर्ग विकास अधिकारी पं.स. समिती पोंभूर्णा मा. श्री अमित लाडे बालविकास अधिकारी पंचायत समिती पोंभूर्णा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिरामध्ये एकूण ७५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी २ मुख कर्करोग,१० हायड्रोसील ,१ हर्निया, २९  मोतीबिंदूची रुग्ण मिळाले.सदर रूग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महादेव चिंचोळे जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती भाग्यश्री भालेराव यांनी  तर आभार प्रदर्शन डॉ हेमचंद कन्नाके निवासी वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांनी केले. सदर आरोग्य शिबिराचे यशस्वी करिता शरद पवार दंत महाविद्यालय  सावंगी मेघे वर्धा , जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी  यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामीण रुग्णालय पोभुर्णा येथील अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page