Friday, December 12, 2025
HomeJayantiमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय बालिका दिवस साजरा
spot_img

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय बालिका दिवस साजरा

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय बालिका दिवस साजरा

श्रेयश वानखेडे:
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडमने  दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यामध्ये  विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली. मंचावर शबाना मॕडम व शैलेजा मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व बालिका दिन तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. याचबरोबर  विद्यार्थिनींनी  गाणे, कविता व अकरावी कला शाखेच्या विद्यार्थिनींनी नाटक सादर केले व शाळेच्या प्राचार्या असमा  खान खलीदी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन वैशाली उमाटे मॅडमने केले व आभार ज्योती खोके मॕडमने मानले.
    या कार्यक्रमास सर्व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page