Thursday, August 6, 2026
spot_img
HomeChandrapur*चंद्रपूर जिल्हा पोलिसांची बेकायदेशीर अमली पदार्थ (NDPS) विरोधात विशेष तपासणी मोहीम*

*चंद्रपूर जिल्हा पोलिसांची बेकायदेशीर अमली पदार्थ (NDPS) विरोधात विशेष तपासणी मोहीम*

*चंद्रपूर जिल्हा पोलिसांची बेकायदेशीर अमली पदार्थ (NDPS) विरोधात विशेष तपासणी मोहीम*

*ज्योत्स्ना वानखेडे*
मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात *बेकायदेशीर अमली पदार्थ (NDPS) ची निर्मिती, साठवणूक व वितरणास प्रतिबंध* करण्यासाठी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.
*मोहीमेची माहिती:*
या अनुषंगाने *दि. 04/08/2026 ते 05/08/2026* रोजी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील परिसर, तसेच पोलीस स्टेशन औद्योगिक परिसरातील *बंद कंपन्या, खाली गोडाऊन व आजूबाजूचा परिसर* येथे तपासणी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या करीता वेगवेगळी पथके तयार करून सदर निर्जनस्थळांना भेटी देण्यात आल्या.
*तपासणीचा निष्कर्ष:*
मोहीमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील *MIDC परिसर, पोलीस स्टेशन परिसरातील बंद कंपन्या, टिन शेड, गोडाऊन, निर्जनस्थळ, पडक्या इमारती* यांची सखोल तपासणी करण्यात आली.
परंतु तपासणीदरम्यान *अमली पदार्थांची निर्मिती, साठवण किंवा वितरणासंदर्भातील कोणतेही संशयास्पद साहित्य किंवा बेकायदेशीर वस्तू आढळून आली नाही.*
*पोलिसांचे आवाहन:*
चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधातील अशा प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.
नागरिकांनी त्यांच्या परिसरात *अमली पदार्थाबाबत कोणतीही संशयास्पद हालचाल* आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा चंद्रपूर जिल्हा पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे.
*महत्वाचे आवाहन*
आपल्या परिसरात कोणीही *अवैध ड्रग्स साठवणूक किंवा विक्री* करीत असेल तर *टिप लाईन क्र. 7887890100* यावर माहिती द्यावी. *माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.*
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page