महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय बल्लारपूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
श्रेयश वानखेडे:
महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथील शाळेत 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव रॅली थाटात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष श्रीमान ऍड. जयंत साळवे यांचे शुभ हस्ते रॅली चे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती अपूर्वा साळवे, संस्थेचे सचिव श्रीमान सुभाष ताजने सर, शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान मकसुद अहमद सर शाळेचे पर्यवेक्षक श्रीमान प्रकाश सर उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी तथा सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी उर्दू माध्यमातील विद्यार्थिनी द्वारा झाकी, वेशभूषा रॅली चे आकर्षण बनले.
सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील माजी विद्यार्थिनी श्रीमती पी. विजयालक्ष्मी शिक्षिका जि. प. शाळा घुग्घुस, कु.फिरदोस सिद्दीकी C.A. तथा श्रीमती डॉ.बदरुंनिसा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेलुगू माध्यम पाळी प्रमुख श्रीमती टी. हेमलता यांनी केले. संचालन श्रीमती रजनी केशकर यांनी केले तथा सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती अर्चना ताजने यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती रवि अनसुरी सर यांनी दिली.