Saturday, December 6, 2025
HomeLekhमुलं, पालक आणि मोबाईलचा मायाजाळ व उपाय📱
spot_img

मुलं, पालक आणि मोबाईलचा मायाजाळ व उपाय📱

मुलं, पालक आणि मोबाईलचा मायाजाळ व उपाय📱

मुलं तासन् तास मोबाईल बघतात. याचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. आणि आता ही एक सामाजिक समस्या झाली आहे. त्यामुळे ही आणखी पाय पासरण्या आधी यावर अचुक उपाय करणे अत्यावश्यक झाले आहे.
    अनेक मुलांना दृष्टी चा त्रास होतोय. बोलण्यात अडखळने, सामाजिक सहभाग कमी होणे, कल्पना शक्ती चा ऱ्हास होणे, पाठीचा भाग कुबड निघाल्या सारखा होऊन खांदे समोर झुकने, मेंदू वर परिणाम होणे, चिडचिडेपणा वाढणे, हट्टी होणे, अभ्यासात लक्ष न लागणे, सायबर गुन्हे, शिवाय इतर ही दुष्परिणाम होत आहेत.
        मोबाईल चे तास कमी करणे हा उपाय तितकासा यशस्वी ठरला नाही.
         पालकांना व शिक्षकांना सुद्धा मोबाईल वर मुलांना जास्त प्रयोग सांगू नये तर बुक, पेन, ब्रश असे साहित्य देऊन त्यांना त्यांच्या कल्पकतेचा वापर करून चित्र, निबंध, किंवा दिवस भर अनुभवलेल्या घटनाक्रम लिहायला लावावे. मुलानं सोबत प्रेमाने वागणे  व हसत बोलणे, जेणे करून मुल पालकांचा विश्वास व प्रेम अनुभव करू शकेल. मुलांना सक्ती करू नये. आवडीचा छंद जोपसण्यासाठी मदत करावी.
          तरुणांनी रील्स व व्हिडियो च अतिरेक टाळावा. मोबाईल वरील रंगबिरंगी जगाचा मोह करू नये. आपली संस्कृती जोपासावी. कारण ते आपल्या देशाचं वैशिष्टय असते. प्रत्येक देशाची संस्कृती तेथील परिस्थिती, हवामान, निसर्गाचे साधन यावर अवलंबून असते. म्हणून इतर देशाचं अनुकरण करण्याआधी आपल्या देशाच्या अस्मितेचा विचार नक्की करावा व इतर देशाला अभिमान वाटेल असे वर्तन करावे.
          वयोवृद्ध लोकांनी मोबाईल चा वापर करमणुकीसाठी करू नये.
       मोबाईल अतिशय उपयोगी वस्तू आहे. जगाची माहिती क्षणात देणार इंटरनेट आहे.तर मग बौद्धिक वाढ होईल, ज्ञानात भर होईल असे वापरावे.
            मनोरंजनाचे साधन म्हणून वापरताना आपल्या व इतरांच्या अस्मितेला हानी होणार नाही असे कार्यक्रम बघावे. आपल्या करियर मधे मदत होईल असा वापर करावं.
          खरंच कधी मोबाईल पासून दूर राहून एकमेकांना सोबत गप्पा मारा, अंताक्षरी खेळा लपंडाव खेळा, लगोरी, खीपर खेळा न मग बघा भूक न झोप कशी मस्त येईल आणि घर कसे आनंदाने भरून जाईल.
त्या हसण्याच्या आवाजाने घराच्या भितीं अन् छप्पर घुमघुमल  पाहिजे. बघा करून.
           स्वाती यादव.
            चंद्रपूर.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page