Saturday, August 8, 2026
spot_img
HomeEducationमराशिपची शिक्षण उपसंचालक यांचेसोबत सहविचार सभा संपन्न

मराशिपची शिक्षण उपसंचालक यांचेसोबत सहविचार सभा संपन्न

मराशिपची शिक्षण उपसंचालक यांचेसोबत सहविचार सभा संपन्न

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग यांची शिक्षण उपसंचालक, नागपूर यांचेसोबत सहविचार सभा काल धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे संपन्न झाली. तब्बल 5 तास चाललेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार नागो गाणार होते.
या सभेला नागपुर विभागातील सहाही जिल्ह्याचे  प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक व लेखाधिकारी उपस्थित होते.  या सभेत विभागातील जवळपास 33 विषयावर सखोल चर्चा होऊन सर्व विषय निकाली काढण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यामध्ये प्रलंबित वरिष्ठ, निवड वेतन श्रेणी प्रकरणे, पदोन्नती प्रकरणे, मंडळ मान्यता, काॅन्व्हेटच्या समस्या बाबत चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बोगस मान्यता, नियमबाह्य दिलेल्या शालार्थ आयडी या बाबत विस्तृत व गंभीर चर्चा करण्यात आली. याशिवाय बोगस मान्यता प्रकरणांमध्ये तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच शिक्षक, मुख्याध्यापक यांचा प्रत्येक शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये सन्मान व्हावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. शिक्षण विभागाच्या सर्व कार्यालयामध्ये यापुढे सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जाईल, असे श्री.उल्हास नरड उपसंचालक नागपूर यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्हात नुकतेच आलेले कार्यकुशल शिक्षणाधिकारी मा. राजेशजी पातळे  रुजु झाल्यापासुन कामाला गती मिळाली त्यांच्या कार्याचे अभिनदंनही करण्यात आले.
सभेचे सूत्रसंचालन विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे, तर आभार प्रदर्शन सहसंचालक लोखंडे साहेब यांनी केले. या बैठकीला मराशिपच्या राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, विभाग अध्यक्ष प्राथमिक विभाग रंजनाताई कावळे, विभाग उपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, विनोद पाढंरे वि. उपाध्यक्ष, विभाग संघटनमंत्री रामदास गिरटकर, कार्यालय मंत्री सुधीर वारकर, कोषाध्यक्ष संतोष सुरावर, उपशिक्षणाधिकारी कु.निखिता ठाकरे, लेखाधिकारी श्री वड्डेटीवार, जिल्हा अध्यक्ष विलास खोंड, शहर कार्यवाह वसंत वडस्कर,  प्राथ. विभाग उपाध्यक्ष विकास नंदुरकर, सौ. सरीता सोनकुसरे प्राथ.अध्यक्षा, झोडे सर, तसेच सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्यवाह व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page