विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सा दृष्टिकोन निर्माण व्हावे – आ. सुधाकर अडबाले
भवानजीभाई चव्हाण विद्यालयात ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी
श्रेयश वानखेडे:
कोराना कालखंडात लॉकडाऊन मुळे सर्व जगाची कोंडी झाली होती. त्यावर विज्ञानामुळे मात करता आली. निसर्गाचा कितीही प्रकोप झाला, तरीही त्यावर मात करण्याची क्षमता विज्ञानामुळेच शक्य आहे. त्याला चालना व अद्यावत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सा दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे. हा हेतू ठेवून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करीत असतो. असे प्रतिपादन जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे सोमवार दि.१३ जानेवारी आयोजित ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी प्रतिपादन केले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून चंद्रपूर – वणी लोकसभा क्षेत्राची खासदार प्रतिभा धानोरकर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद चंद्रपूर राजेश पातळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी सोनवणे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक निवास कांबळे, सहसचिव ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ लक्ष्मणराव धोबे, प्राचार्य भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर जयंत टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होते.
शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयावर ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ व उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२ ते २०२७ अंतर्गत जिल्हास्तरीय उल्हास मेळावा चे आयोजन दिनांक १२, १३ व १४ जानेवारी २०२५ स्थानिक भवानजीभाई चव्हाण हायस्कूल येथे आयोजित उद्घाटनिय कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी केले तर सूत्रसंचालन रोहिणी निले, अविनाश जुमडे आणि आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी (माध्य.) निखिता ठाकरे यांनी केले होते. सदर प्रदर्शनीमध्ये जिल्हाभऱ्यातून जवळपास १३० विज्ञान प्रतिकृती आणि बाल संशोधक सहभागी झाले होते. विज्ञान प्रदर्शनात वर्ग ६ वी ते ८ वी प्राथमिक गट, कनिष्ठ महाविद्यालय गट, आदिवासी गट , बिगर आदिवासी गट, दिव्यांग विद्यार्थी गट, प्रशिक्षित शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती असे विविध गट सहभागी झाले होते.