व्यापाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ जानेवारीला गुन्हा दाखल केला. तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी असून ते कमिशन वर लाकूड बांबू व तेंदूपत्ता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचविण्याचे काम करतात.
ऑगस्ट महिन्यात तक्रारदार यांनी १९ लाख २ हजार रुपयांचा तेंदूपत्त्याचा माल गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे आणले होते. त्या मालाचे १९ लाख २ हजार हि रक्कम व्यापाऱ्याकडून येणे बाकी होते, मागील ३ ते ४ महिन्यापासून तक्रारदार यांना त्या मालाचे पैसे मिळत नसल्याने त्यांनी आपले पैसे मिळावे यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार अर्ज दाखल केला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदाराला सदर रक्कम वसूल करण्याच्या कामासाठी वीस टक्के रक्कम ३ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदार व व्यापारी या दोघांनी आपसात सेटलमेंट केले व गुंतवलेली मुद्दल १६ लाख १५ हजार रुपये व्यापाऱ्याने तक्रारदाराला परत केले. पैसे मिळाल्यावर त्या व्यापारी विरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये केलेला तक्रारअर्ज परत घ्यायचा आहे असे पोलीस उपनिरीक्षक यांना सांगितले, दोघांची तडजोड झाल्याने पोलीस उपनिरीक्षक याना पैसे मिळणार नसल्याचे समजताच त्यांनी तक्रारदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने ८ जानेवारीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी दरम्यान पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदार यांना तडजोड करीत ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे १३ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे गेले असता कारवाईचा संशय आल्याने ते तिथून गेले. पोलीस उपनिरीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक ला.प्र.वि दिगंबर प्रधान नागपूर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि सचिन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पो. हवा. हिवराज नेवारे, पो.हवा. अरूण हटवार, पो.हवा. नरेशकुमार नन्नावरे,, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर तसेच चापोशि संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी केले.