कचरा नियोजन.
सरकार तर्फे कचरा नियोजन चे उपक्रम राबविले जातात आहे. घरोघरी कचरा वाहन गाड्या येतात. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचे सांगितले जाते.
स्वच्छ भारत अभियान गावोगावी राबविले जात आहे. देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः झाडू मारून आणि समुद्र किनारा वरून कचरा उचलला आहे.
भारतीय म्हणून प्रत्येक नागरिकाने आपला १००% सहभाग द्यायला हवा. प्रत्येकाने आपल घर जेवढं स्वच्छ ठेवतो त्या पेक्षा जास्त आपला आजूबाजूचा परिसर, आपली सोसायटी, आपला वॉर्ड, आपला गाव, आपला तालुका, जिला, स्टेट, देश असा चढता क्रमावर विचार करावा. जर आपण जिथे राहतो, जिथे जिथे जातो तिथे तिथे प्रत्येकाने स्वच्छ्ता ठेवली तर उपक्रम राबविणे अगदी सोपे आहे.
रस्त्यावर कचरा न फेकणे, रस्त्यावर न थुंकणे, घाण न करणे, घरातील कचरा बाहेर न फेकता कचरा गाड्यात टाकने एवढ्या ने आपण अनेक रोगांवर मात करू शकतो. स्वच्छ भाजीपाला व स्ट्रीट फूड घेऊ शकतो. दवाखान्याचे व्हायरस मुले होणाऱ्या आजाराचे बिल वाचवू शकतो. प्रदूषण टाळून भरपूर ऑक्सीजन घेऊ शकतो.
आपल्या मुलाबाळांना निरोगी, स्वस्थ आरोग्य देऊ शकतो. जे कुठल्याही बँक बॅलन्स पेक्षा जास्त आहे.
स्वतः च् सवयी वर नियंत्रण ठेऊन आपण आपला देश सुंदर स्वस्थ करू शकतो.
करून बघा.
सौ. स्वाती यादव
चंद्रपूर