Sunday, December 7, 2025
HomeMaharashtraनूतन विद्यालय, सेलूच्या क्रीडा यशाचा पालक मंत्र्याच्या हस्ते गौरव.
spot_img

नूतन विद्यालय, सेलूच्या क्रीडा यशाचा पालक मंत्र्याच्या हस्ते गौरव.

नूतन विद्यालय, सेलूच्या क्रीडा यशाचा पालक मंत्र्याच्या हस्ते गौरव.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रियदर्शनी स्टेडियम येथे पार पडला विशेष समारंभ. 

श्रेयश वानखेडे:
नूतन विद्यालय, सेलूने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षा खालील आणि १७ वर्षाखालील वयोगटात उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. क्रीडा प्राविण्य प्रोत्साहन अनुदान अंतर्गत या यशाचा शाळेचा गौरव करण्यात आला. नूतन विद्यालयाचा सन्मान जिल्हा क्रीडा प्राविण्य प्रोत्साहन कार्यक्रमात पालक मंत्री मा. ना. श्रीमती मेघनासाकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (भा.प्र.से.), जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे उपस्थित होते. १४ वर्षाखालील वयोगट (सन २०२३-२४): द्वितीय क्रमांकासाठी ₹. ६२,६५४ रोख रक्कम आणि सन्मानपत्र प्रदान. १७ वर्षाखालील वयोगट (सन२०२३ -२४): द्वितीय क्रमांका साठी ₹. ६२,६५५ रोख रक्कम आणि सन्मान पत्र प्रदान. वरील दोन्ही गटांसाठी एकूण दोन चेक शाळेला प्रदान करण्यात आले.
मुख्याध्यापक संतोष पाटील, क्रीडा शिक्षक गणेश माळवे, व शिक्षक बाळू बुधवंत यांनी शाळेचा सन्मान स्वीकारला. उल्लेखनीय कार्याचे कौतुक पालकमंत्री नामदार मेघनासाकोरे-बोर्डीकर यांनी नूतन विद्यालया च्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी शाळेने भविष्यात राज्यस्त रावरही यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा उंचावली कार्यक्रमा दरम्यान विद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आपल्या गुणवत्तेने प्रतिष्ठा वाढवली असल्याचे अधोरेखित करण्यात आले. सर्व मान्यवरांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. नूतन विद्यालयाच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page