Thursday, July 16, 2026
HomeHealth & Fitnessजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन, राष्ट्रीय मानसिक स्वास्थ कार्यक्रम तथा संवेदना तर्फे सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत अध्यक्षस्थानी मान. बी. बी. भगत मुख्याध्यापक तथा प्रमुख मार्गदर्शक मान. सचिन तल्हार समुपदेशक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, मान. श्रुती तल्हार संवाद मित्र, मान. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक यांची मंचावर उपस्थित होती.
प्रमुख मार्गदर्शक मान. सचिन तल्हार समुपदेशक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, मान.श्रुती तल्हार संवाद मित्र यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सर्वांसाठी बाबत माहिती दिली.
कार्यशाळेचे  प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन व आभार प्रदर्शन आर. बी. अलाम यांनी केले.
कार्यशाळेत यु. के. रांगणकर, एस. एम. चव्हाण, एस. एन. लोधे मॅडम, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसहित विद्यार्थी वृंद उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page