Saturday, June 20, 2026
HomeChandrapurजनता विद्यालय ताडाळी ( रेल्वे ) येथे सांस्कृतिक कार्यक्रम व माजी मुख्याध्यापकांचा...
spot_img

जनता विद्यालय ताडाळी ( रेल्वे ) येथे सांस्कृतिक कार्यक्रम व माजी मुख्याध्यापकांचा सत्कार

जनता विद्यालय ताडाळी ( रेल्वे ) येथे सांस्कृतिक कार्यक्रम व माजी मुख्याध्यापकांचा सत्कार

श्रेयश वानखेडे:

76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता विद्यालय  ताडाळी  ( रेल्वे )  व जनता कॉन्व्हेंट येथे वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. खोखो, कबड्डी, गीत गायन  स्पर्धा, समूह नृत्य, चित्रकला स्पर्धा, एकल नृत्य, स्मरणशक्ती स्पर्धा, पोता रेस स्पर्धा, भाषण स्पर्धा, प्रश्नमंजुषा  अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
 कार्यक्रमाचे उद्घाटक धारिवाल कंपनीचे शाखा व्यवस्थापक श्री. तोटावार, डॉ. नायर  ( धारिवाल कंपनीतर्फे वॉटर कुलर  देण्यात आले ), माजी मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. माजी मुख्याध्यापक श्री. टाकसाळे, श्री. खुसपुरे, श्री. मोरे, श्री. ठाकरे, ग्रामपंचायत ताडाळीचे उपसरपंच  निखिलेश चांभरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री. जिवतोडे, संचालन दहावीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी मेश्राम, कुमारी गोहणे व आभार प्रदर्शन श्री. धांडे  यांनी केले.कार्यक्रमाला गावातील पालक मंडळी, माजी विद्यार्थी, प्रमुख अतिथी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page