Sunday, September 13, 2026
spot_img
Homeबल्लारपूरइतिहास विभागाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधीजींना अभिवादन

इतिहास विभागाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधीजींना अभिवादन

इतिहास विभागाद्वारे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधीजींना अभिवादन 

श्रेयश वानखेडे:

बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळ द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ किशोर चौरे यांची विचार मंचावर उपस्थित होती यावेळी विचार व्यक्त करतांना डॉ. चव्हाण म्हणाले की ” महात्मा गांधीजीं एक व्यक्ती नसून विचारधारा होय ज्यांनी सत्य व अहिंसा या तत्वाचा स्विकार केला. यासोबतच महात्मा गांधीजींच्या जीवन काळात प्रतिगामी विचारांनी अनेक वेळा जीवघेणे हल्ले केले व अशाच एका हल्ल्यात 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींना आपला जीव गमवावा लागला. मात्र गांधीजींचे विचार हे चिरकाल टिकणारे आहेत. म्हणून आजही गांधीजींची विचारधारा अस्तित्वात आहे.” आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. रजत मंडल म्हणालेत की ” महात्मा गांधीजीं आपल्या आयुष्यात सत्याग्रह या अस्त्राचा वापर करून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजीच्या विचाराचे महत्वाचे योगदान आहे. ” या कार्यक्रमाला डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. रोशन फुलकर, डॉ. पंकज कावरे,  डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. जयेश गजरे, प्रा. श्रद्धा कवाडे यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. किशोर चौरे (इतिहास विभागप्रमुख)यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page