सेलू नगरीच्या जडणघडणी मध्ये माजी नगराध्यक्ष श्री विनोद हरीभाऊकाका बोराडे यांचा सिंहाचा वाटा
परभणी जिल्हयातील सर्वोत्तम अशी नगर पालिका सेलू हि असून गेल्या पंचेवीस ते तीस वर्षापासून सेलू तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात दलित मित्र कै. श्रीरामजी भांगडिया यांच्या नंतर एकच नाव समोर येते ते म्हणजे श्री विनोद हरीभाऊकाका बोराडे हे होय. त्यांनी आपल्या नगरसेवक कारकिर्दी पासून ते नगराध्यक्ष पदापर्यंत च्या आपपल्या पंचेवीस ते तीस वर्षाच्या कालावधी मध्ये सेलू नगरीला अतिशय सुंदर आणि शहर म्हणून नाव लौकिक मिळवून देणारे, सर्व जनतेचे लाडके आणि लोकप्रिय नेते म्हणजे आपले माजी नगराध्यक्ष श्री विनोद हरीभाऊकाका बोराडे. हे एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणे कार्य करणारे, धाडशी निर्णय घेणारे म्हणून परिचित आहेत.
आपल्याअनेक वर्षच्या कालावधी मध्य त्यांनी अनेक अडचणी वर मत करीत सेलू शहराला विकसित करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्यकाळात सेलू शहरातील अनेक वार्डातील सिमेंट रस्ते, नाल्या, बाग्बागीच्या आधी महत्त्वपूर्ण कार्य करीत शहराला आकर्षक करण्याचे कार्य केले. सर्वात म्हणजे सेलू शहरातील सर्व समाजाच्या स्मशान भूमी चा प्रश्न सोडवून शहरातील सर्व स्मशान भूमी अतिशय सुंदर आणि सुरेख बांधून त्या मध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी घंटा गाडीची व्यवस्था करून दररोज कचरा संकलित करून कचरा डेपो मध्ये जम केला जातो. दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्ये चा वाढता व्याप लक्षात घेता लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करने हे फार मोठे जाक्रीचे कार्य त्यांनी आपल्याच कार्यकाळात लोअर दुधना येथून नवीन लोखंडी पाईप लाईन टाकून पूर्ण केले. आज पूर्ण सेलू शहराला दररोज वेगवेगळ्या वर्डमध्ये नियमित पणे पाणी पुरवठा करून संपूर्ण जनतेला शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे श्रेय त्यानाच जाते. सेलू शहराची निकड लक्षात घेता अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध करून सेलू कराची सुरक्षिता वाढविली प्रत्येक वार्डात सिमेंट रस्ते, नालीसफाई यांचे सुंदर असे नियोजनकरून कुठेही रस्त्यावर कचरा व घाण आढळणार नाही याची दक्षता घेऊन नियोजन बध्द शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे कार्य केल्यामुळे स्वछेतेचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मन विनोद बोराडे यांच्या सुबद्ध नियोजना मुळेच प्राप्त झाला.
सेलू शहर हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्रात मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते. याचेच भान लक्षात ठेऊन शहरामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विनोद बोराडे व मित्र मंडळ याच्या माध्यमातून केले जाते त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील कुठलेही सन असो किंवा धार्मिक कार्य असो त्यांचा सिंहाचा वाटा असतो. महिलासाठी मंठा येथे गेल्या चौदा वर्षापासून देवीच्या दर्शणासाठी नवरात्री मध्ये मोफत वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. नाग पंचमी निमित्त झोका माझा उंच या उपक्रमां अंतर्गत गेल्या सात वर्ष्यापासून महिलांना झोका, लहान मुलांना खेळण्यासाठी राहाटपाळणे आदी असे अनेक मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.एकंदरीत सर्व सामान्य माणसांशी नाळ जुळवून घेणारा, सर्वच्या प्रत्येक सुख दुखात सहभागी होणारा असा हा लोकप्रिय नगराध्यक्ष असल्याने जनता त्यांना आपल्याच घरातील सदस्य मानतात.
उद्या होणाऱ्या महारष्ट्र राज्यव्यापी पत्रकार संघाचे स्वागताध्यक्ष पद सुद्धा ओघानेच त्यांच्या कडे आले आहे. त्या निमित्ताने हा लेख लिहण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले.