Monday, April 20, 2026
Homeबल्लारपूरमहात्मा ज्योतीबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे शहीद दिन...
spot_img

महात्मा ज्योतीबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे शहीद दिन निमित्त सर्वधर्म प्रार्थना सभेचे आयोजन करून शहिदांना विनम्र अभिवादन

महात्मा ज्योतीबा फुले  हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे शहीद दिन निमित्त सर्वधर्म प्रार्थना सभेचे आयोजन करून शहिदांना विनम्र अभिवादन

श्रेयश वानखेडे:

दिनांक 30 जानेवारी 2025 रोज गुरुवार ला महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय बल्लारपूर येथील प्रांगणात सर्वधर्म प्रार्थनेचे शाळेचे  मुख्याध्यापक श्रीमान मकसुद अहमद यांचे अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.  या प्रसंगी संस्थेचे सचिव श्रीमान सुभाष ताजने सर, शाळेतील पर्यवेक्षक श्रीमान प्रकाश सर, सर्व माध्यमातील पाळी प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा तिन्ही माध्यमातील विद्यार्थी विद्यार्थिनी  उपस्थित होते
  कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक श्री रवी अन्सुरी सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन धर्माची प्रार्थना प्रस्तुत केली. श्री अजयपाल सूर्यवंशी सर यांनी ‘वैष्णव जन’ हे गांधीजींचे प्रिय भजन सादर केले तथा श्री रवी अन्सूरी सर यांनी ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे गीत प्रस्तुत केले. ठीक अकरा वाजता दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते  करता सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page