साईबाबा नागरी बँकेला अकराव्या वेळेस ‘ बँको पुरस्कारा ’ ने सन्मानित.
श्रेयश वानखेडे :
राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करणार्या साईबाबा नागरी सह. बँकेला ‘अविज पब्लिकेशन’ च्या वतीने सलग अकराव्या वेळेस ‘बँको पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण 28 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजता लोणावळा येथील ऍम्बे व्हेली रिसोर्ट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आरबीआय निवृत्त अधिकारी भारगेश्वर बॅनर्जी, अशोक नाईक, अविनाश शिंत्रे यांच्याहस्ते बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, संचालक राजेंद्र आडळकर, बालचंदानी कन्हैयालाल, दत्तात्रय आंधळे, सुभाष चव्हाण, अॅड. भगवान शिरसाठ, शेख इम्रान, गंगाधर आडळकर, सुनील आडळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी देणार्या संस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने अविज पब्लिकेशन व गॅलक्सी इग्मा पुणे यांच्या वतीने राज्यातील सहकार क्षेत्रात काम करणार्या संस्थेची रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त अधिकार्यांच्या समितीद्वारे कठीण निकषांच्या आधारे माहिती घेऊन परिक्षण केले जाते.
200 ते 225 कोटी रुपये ठेवी असलेल्या वर्गातुन तिसर्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला या सर्व निकषात साईबाबा नागरी बँक योग्य ठरली त्यामुळे सलग अकरा वेळेस बँको पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.साईबाबा नागरी बँक ही सेलू, परभणी, मानवत, वालूर, जितूर, बोरी या सहा शाखेतुन काम करत आहे. संस्थेने आपल्या सर्वच शाखा सुसज्ज व संगणीकृत केल्या असूनग्राहकांना आरटीजीस,एनएफटी, मोबाईल बँकिंग, एटीम, क्यूआर कोड अशा सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी आपल्या ग्राहकांना देत आहे.
सर्वच शाखांमध्ये उच्च विद्याविभूषित कर्मचारी वृंद ग्राहकांना आपली सेवा देण्यास सदैव तत्पर असतात. दरम्यान, सभासद व ग्राहक यांच्या सहकार्या मुळेच हा सलग पुरस्कार मिळत आहे, अशी प्रतिक्रया बँको पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल संस्थेचे संस्था पक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी व्यक्त केली असून संचालक मंडळ, ग्राहक व सभासद कर्मचार्यांचे अभिनंदन केले.