Sunday, September 20, 2026
spot_img
HomeParbhaniगुणांच्या टक्केवारी वरून विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यमापन करू नये- डॉ. रोहिणी देशपांडे.

गुणांच्या टक्केवारी वरून विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यमापन करू नये- डॉ. रोहिणी देशपांडे.

गुणांच्या टक्केवारी वरून विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यमापन करू नये- डॉ. रोहिणी देशपांडे.

नूतन कन्या प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा संपन्न.

श्रेयश वानखेडे : 

” गुणांच्या टक्केवारीच्या मागे न पडता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कलागुणांना वाव देत स्वतःचे कार्य कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा “. असे प्रतिपादन डॉ. रोहिणी देशपांडे (सुतवने ) यांनी केले .

नूतन कन्या प्रशालेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.रोहिणी देशपांडे बोलत होत्या. नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा दिनांक 31.1.2025 रोजी नुकताच पार पडला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया, प्रमुख अतिथी डॉ. रोहिणी देशपांडे (सुतवणे)व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, नूतन कन्या प्रशाला शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तरावजी पावडे नाना, नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारणी सदस्य शिक्षक प्रतिनिधी सतीश कुंडीकर, शालेय समिती शिक्षक प्रतिनिधी कैलास मलवडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्याक परशुराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे , माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सुवर्णा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

 पाहुण्यांचे लेझीमच्या पथकात औक्षणाद्वारे स्वागत झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख अतिथी डॉ. रोहिणी देशपांडे (सुतवणे) यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उल्लेखनीय कार्या बद्दल शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती  आणि प्रशाले तील क्रीडा शिक्षक किशोर ढोके यांचाही सत्कार करण्यात आला. प्रशालेतील उत्कृष्ट विद्यार्थिनी, उत्कृष्ट खेळाडू ,कलारत्न पुरस्काराने प्रशालेतील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धा परीक्षा, चित्रकला परीक्षा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, वर्ग सजावट स्पर्धा, महिला पालकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा, कै. सौ दुर्गाताई दत्तात्रय कुलकर्णी आणि नूतन कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथाकथन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्वागत गीत पूजा महाजन आणि  संच यांनी सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका निशा पाटील यांनी केले तर अहवाल उपमुख्याध्यापक परशुराम कपाटे यांनी सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत, श्रेया राऊत, ज्ञानेश्वरी रासवे ,अपेक्षा मोगल यांनी केले तर आभार पर्यवेक्षक दत्तराव घोगरे यांनी मानले. यादी वाचन सुहास देऊळगावकर, उपेंद्र दिवाळकर, सुषमा दामा, वैशाली चव्हाण, सीमा सुकते, ज्योती कुंभकर्ण, सुनील मोगल, प्रकाश खराटे, किशोर ढोके, सपना पाटनी, विजय धापसे, रेणुका आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर, शशिकांत देशपांडे, नागेश देशमुख, संगीता खराबे, शंकर बोधनापोड, बाबासाहेब थोरे, अनंता बोराडे, विनोद शिंदे,यांनी सहकार्य केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page