Sunday, September 13, 2026
spot_img
HomeParbhaniनगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंड जबाबदार अधिकाऱ्याकडून खर्च वसूल करण्याची मागणी.

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंड जबाबदार अधिकाऱ्याकडून खर्च वसूल करण्याची मागणी.

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंड जबाबदार अधिकाऱ्याकडून खर्च वसूल करण्याची मागणी.

श्रेयश वानखेडे : सेलू शहरात विकासकामांचा धडाका मागील काही दिवसांपासून सुरू आहे. नवीनरस्ते, नाली, सुशोभीकरण आदी नागरिकांच्या सुविधे साठी करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ते मदरसा पर्यंत असलेला रस्ता हा नगर परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करून नवीन राज्य महामार्ग गेल्यावर्षी तयार करण्यात आला होता. या राज्य महा मार्गावर दळण वळण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून नागरी वस्ती मुळे दरदिवशी अनेक अपघात होत आहेत.त्यातच भरीस भर म्हणून वालूर नाका परिसरात जलवाहिनी जोडणीचे काम मागील दीड महिन्यापासून हाती घेण्यात आले असून नवीन झालेल्या रोडवर मोठ्या प्रमाणा त खोदकाम करण्यात आले आहे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नसून नवीनच झाले ल्या राज्य महामार्गाचे मोठे नुकसानकरण्यात आले आहे.हा राज्य महामार्ग बनविण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अंतर्गत असलेल्या जलवाहिनीचे काम त्याच वेळी हाती घेवून पूर्ण केले गेले नाही त्यामुळे सद्यस्थितीत नवीन झालेला रोड खोदून जोडणी करण्यात येत आहे.या मनमानी कारभारामुळे नागरिकांकडून गोळा केलेला पैशाचा अपव्यय होत असून गैर जबाबदारीने वागणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांच्या पगारा तून हा खर्च वसूल करण्यात यावा. अशी मागणी मोरया प्रतिष्ठान व सेलू शहरातील नागरिकां कडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page