Wednesday, April 15, 2026
Homeबल्लारपूरबल्लारपुरात महामानवांचा जयंती महोत्सव
spot_img

बल्लारपुरात महामानवांचा जयंती महोत्सव

बल्लारपुरात महामानवांचा जयंती महोत्सव

श्रेयश वानखेडे:
संत तुकाराम महाराज सेवा मंडळ, बल्लारपूर -बामणी तर्फे, संत तुकाराम संत तुकाराम महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने महामानवाच्या जयंती महोत्सवाचे व मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 ला संत तुकाराम महाराज सभागृह, बल्लारपूर येथे आयोजित केलेला आहे.
सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत विविध मंडळाचे भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी पाच वाजता जयंती महोत्सव, प्रबोधनपर व्याख्यान व मा. आमदार देवरावजी भोंगळे, राजुरा विधानसभा व मा. आमदार संजयजी देरकर, वणी विधानसभा यांचा सत्कार आयोजित केलेला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संजीव कोंडेकर, उमरेड यांचे “तुकोबांचा वैचारिक वारसा:शिवराय ते गाडगेबाबा” या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी. यु. जरीले अध्यक्ष संत तुकाराम महाराज सेवा मंडळ, उद्घाटक मा. श्रीमती अलकाताई वाढई संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. शरीफ गुरुजी अध्यक्ष, अश्फाकउल्ला खान मेमोरियल सोसायटी, मा. विजय मोरे अध्यक्ष, बळीराजा नागरी सहकारी पतसंस्था राजुरा अँड. पवन मेश्राम कार्याध्यक्ष, जयभीम बहुउद्देशीय संस्था हे राहणार आहे. आयोजका तर्फे नागरिकांना विनंती आहे की या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने परिवारासह उपस्थित रहावे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page