Monday, April 20, 2026
Homeबल्लारपूरजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ब्रेड आणि तोस...
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ब्रेड आणि तोस बनवायची प्रक्रिया

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ब्रेड आणि तोस बनवायची प्रक्रिया

श्रेयश वानखेडे:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांनी शाळेजवळ असलेल्या नुरी बेकरी येथे जाऊन ब्रेड आणि तोस बनवण्याची प्रक्रिया जाणून घेतली.
ब्रेड बनवण्याची प्रक्रिया:
50 किलो मैदा, 10 किलो साखर, 100 ग्रॅम यिस्ट पावडर, 50 ग्रॅम वेनिला पावडर, 150 ग्रॅम मीठ घ्यावे. त्याला साच्यात घेऊन फुगवावे. त्यात 1 किलो तेल घालावे. त्याला फुगवावे. त्याचे 50g, 30 g, 20 g असे पीस बनवावे. अलग अलग ट्रॉलीमध्ये टाकावे. पुन्हा फुगवावे.  मशीन मध्ये गरम करावे. अशाप्रकारे ब्रेड तयार होतात.
तोस बनवण्याची प्रक्रिया:
50 किलो मैदा, 15 किलो साखर, 200 ग्रॅम यिस्ट पावडर, 200 ग्राम वेनीला, 200 ग्रॅम मीठ, 2 किलो तेल, एक ते दोन तासासाठी एकत्र भिजवावे. त्याला फुगवावे. प्रत्येकी 400 ग्राम ची कटिंग करून लोही बनवावी. त्याला  फुगवावे. मशीन मध्ये 250 वाॅट वर फुगू द्यावे. लादी बनल्यानंतर कटिंग करावी. पुन्हा शेकावे.
अशी माहिती नुरी बेकरी के संचालक मान. मुर्तूजा शेख यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिली. यावेळी बी. बी. भगत मुख्याध्यापक, एम. डी. टोंगे, आर. के. वानखेडे, आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर आदी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page