Monday, May 25, 2026
HomeParbhaniशॉर्टसर्किटमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट.
spot_img

शॉर्टसर्किटमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट.

शॉर्टसर्किटमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट.

संसारोपयोगी साहित्य जळून खाक :  आहेर बोरगाव येथील घटना. 

श्रेयश वानखेडे :
सेलू तालुक्या तील आहेर बोरगाव येथे राहत्या घरी शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीमुळे गॅसचा स्फोट झाला. या आगीत शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले.येथील हरिभाऊ विठ्ठलराव लहाणे यांच्या राहत्या घरी बुधवारी (दि.05) सकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत घरातील गॅस सिलेंडने पेट घेतला, त्यात सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग अधिकच वाढली. या आगीत घरातील कापूस, रोख रक्कम, सोन्याचे दागिणे, ज्वारी, गहू, तूर व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून शेतकर्‍याचे 12 लाख 63 हजार 200 रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही. दरम्यान, महसूलचे तलाठी, ग्रामसेवक व गॅस एजन्सीचे प्रतिधींनी या घटनेचा पंचनामा केला.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page