Friday, May 1, 2026
HomeParbhaniज्यांचे कर्म चांगले आहेत अश्यांची सुसंगत करावी: दिगांबर महाराज नखाते.
spot_img

ज्यांचे कर्म चांगले आहेत अश्यांची सुसंगत करावी: दिगांबर महाराज नखाते.

ज्यांचे कर्म चांगले आहेत अश्यांची सुसंगत करावी: दिगांबर महाराज नखाते.

संत तुकाराम महाराज बीज निमित्त डॉ.दिगंबर घोडके परिवार तर्फे कीर्तनाचे आयोजन.

श्रेयश वानखेडे: सेलू येथील पारीख कॉलनी येथील रहिवासी डॉ.दिगंबर घोडके यांचे आई काशीबाई वडील तुळशीराम घोडके यांनी आपल्या आयष्यातील सर्वात मह्त्वाची यात्रा म्हणजे चारी धाम यात्रा पूर्ण केली कारण त्यांनी आपल्या आयुष्यात सदैव चांगल्या सत्कर्म व्यक्तीच्या सानिध्यात राहून आपल आयुष्य व्यतीत केले सत्संग चागला केला म्हणून ते कोरोना सारख्या महामारीतून वाचले आहेत. संगत चागल्या व्यक्तीची धरा म्हणजे पुण्यकर्म आपोआप घडते.घोडके परिवारांनी सत्संग केला म्हणून आज त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण यात्रा सफल केली असे प्रतिपादन नखाते महाराज हदगावकर यांनी केले. याप्रसंगी साईबाबा सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.हेमंतराव आढळकर, आर.बी.घोडके इन्फ्रस्ट्रक्चरचे संचालक रामप्रसादजी घोडके, माजी नगराध्यक्ष पवण आढळकर,माजी नगराध्यक्ष संदीप लहाने, डॉ.जनार्धन गोळेगावकर, डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ .प्रताप घांडगे,ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे,पत्रकार,शिवाजी शिंदे,बाबासाहेब हेलसकर,ताठे कोचिंग क्लासेसचे संचालक गुलाब ताठे, आदींची उपस्थिती होती.महाराजांनी दानाचे महत्व सांगताना, अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. हाताने दान करावे,पायाने चार धाम यात्रा करावी,मुखाने नामस्मरण करावे असे सांगून बदलत्या काळानूसार भौतिक सुविधा भरपूर आल्या पण त्यातून समाधान मात्र आपण गमावून बसलो आहोत असे ही त्यांनी व्यक्त केले. उध्दव महाराज पांचाळ, केशव महाराज,रामभाऊ वाघ,बळीराम घांडगें, आसाराम महाराज,अनंतराव भुजबळ,नारायण महाराज हरकळ, अभिषेक महाराज आदींनी साथसंगत केली. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रम यशश्वीतेसाठी, ऑरकॉम कॉम्पुटरचे संचालक घांडगें,ताठे सर, डाखोरे सर,श्रीकांत झुटे व मित्र मंडल आणि गावकरी मंडळीनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page