Friday, June 19, 2026
HomeChandrapurम.रा.शि.प. च्या वतीने जागतिक महीला दिना निमित्य कर्तृत्ववान महीलांचा सन्मान
spot_img

म.रा.शि.प. च्या वतीने जागतिक महीला दिना निमित्य कर्तृत्ववान महीलांचा सन्मान

म.रा.शि.प. च्या वतीने जागतिक महीला दिना निमित्य कर्तृत्ववान महीलांचा सन्मान

श्रेयश वानखेडे:

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे तर्फे आयोजित श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह चंद्रपूर येथे महिला संमेलनाप्रसंगी बोलताना  वित्त, वने, सांस्कृतिक कार्य माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी म्हटले.

जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात सर्व महिलांना शुभेच्छा देताना महिला ही पुरुषापेक्षा जास्त कर्तुत्वान आहे व त्यांना संधी मिळालाच ते संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असेही म्हटले.

कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांचे प्रश्न गंभीर असून राज्यात शिक्षण कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अनेक शिक्षकांना अल्प वेतनात काम करावे लागते व संस्थाचालकांच्या रोशाला बळी पडावे लागते याची मला कल्पना आहे. मी आपणाला आश्वासित करतो की बैठका घेऊन व माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या सोबत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.

याप्रसंगी माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी महिलांना शुभेच्छा देत जुनी व नवीन पेन्शन योजना बाबत व IPS, RPS, UPS चे सखोल मार्गदर्शन केले,तथा जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणारच असे म्हटले.

महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी डॉक्टर कल्पना गुलवाडे यांनी महिलांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे व नित्य व्यायाम करणे किती गरजेचे आहे हे समजून सांगितले. या प्रसंगी संपूर्ण स्वास्थ जन्म अभियान शुभारंभ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला सबलीकरण या विषयावर सामाजिक कार्यकर्त्या नम्रता ठेम्सकर यांनी महिलांना राजकीय क्षेत्रात कार्य करण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने यावे व महिलांना सामाजिक स्तरावर न्याय मिळवून द्यावा असे म्हटले.

प्राचार्य अरुंधती कावडकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षाप्रसंगी  मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्रांत महिला आघाडी प्रमुख  पूजाताई चौधरी यांनी बोलताना म्हटले की शिक्षण क्षेत्रात 70 टक्के महिला असून अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी त्या पुढाकार घेत नाही. त्यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे येऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अन्याय विद्याविरोधातील आंदोलनात सहकार्य करावे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सरीता सोनकुसरे  यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यात सहकार्य करण्याचे आवाहान केले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती डॉ. मंजुषा मते आदर्श हिंदी विद्यामंदिर गडचांदूर , कुमारी नलिनी पिंगे आदर्श मराठी विद्या मंदिर राजुरा, सुनिता बुटे बालविकास प्राथमिक शाळा मुल, मालू कोटकर सावित्रीबाई फुले शाळा  चंद्रपूर, शबनम आरा शेख उर्दू प्राथमिक शाळा घुगुस, सुचरिता काळे जिल्हा परिषद शाळा सीनाळा, जयश्री दुआवर जिल्हा परिषद शाळा नांदगाव पोडे, अर्चना गर्मडे जिल्हा परिषद शाळा पवनी, सुजाता मोहरील माउंट कॉन्व्हेंट घुगुस, शुभांगी डोंगरवार न्यू इंडिया कॉन्व्हेंट चंद्रपूर, सिमरन सहानी खालसा कॉन्व्हेंट चंद्रपूर, बबीता भालेराव कारमेल अकॅडमी चंद्रपूर, वैशाली धर्माधिकारी विद्यानिकेतन कॉन्वेंट चंद्रपूर, रजनी चुलबुले कर्मवीर विद्यालय नागभीड, संध्या बडकेलवार लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा व प्रमुख अतिथींचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास्थळी रक्त व बीपी तपासणीची निशुल्क व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराशिप चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्याताई गिरडकर तर संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष मंगलाताई डांगरे यांनी केले.

कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्य महिला शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विलास खोंड, मधुकर मुपीडवार, विवेक आंबेकर, अमोल देठे, दिलीप मेकलवर, प्रदीप रत्नावार, संतोष सोनवणे, विलास खाडे, संजय उपाध्ये,  सुनील पाचखेडे, विकास नंदुरकर, वसंत वडसकर, रजनी पोडे, विजयालक्ष्मी पोरेड्डीवार, करुणा ठाकूर, भारती पाजनकर, योगिनी दिघोरे, विना आंबटकर तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page