Thursday, April 16, 2026
Homeबल्लारपूरजिजाऊ रथयात्रा ११ एप्रिल रोजी बल्लारपुरात
spot_img

जिजाऊ रथयात्रा ११ एप्रिल रोजी बल्लारपुरात

जिजाऊ रथयात्रा ११ एप्रिल रोजी बल्लारपुरात

श्रेयश वानखेडे:
मराठा सेवा संघ ही नोंदणी सार्वजनिक संस्था असून, गेल्या ३५ वर्षापासून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, परिवर्तनवादी प्रगतशील आणि सकारात्मक कार्य करीत आहे. समाजाच्या हितासाठी विविध 33 पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र सह देशपातळीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले आहे.
समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे समाजमन अस्वस्थ संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे.  ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक युवती, विद्यार्थी, शेतकरी, महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी व समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या एक्क्याचा जागर घालण्यासाठी, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा २०२५, अंतर्गत मराठा सेवा संघाच्या वतीने १८ मार्च ते १ मे दरम्यान महाराष्ट्रभर सर्व जातीधर्मीय समाज जोडो अभियान हे ब्रीद घेऊन जिजाऊ रथयात्रा फिरणार आहे.
बल्लारपूर शहरात ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता, जिजाऊ रथयात्रेचे चंद्रपूर वरून आगमन होत असून कला मंदिर पेपर मिल येथून बाईक रॅली द्वारे रथयात्रेला नगर परिषद चौक येथे, आल्यानंतर बल्लारपूर वाशिय सर्वधर्मीय नागरीकांतर्फे. रथयात्रेचे स्वागत व जनसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे, या स्वागत कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने युवकांनी व नागरिकांनी उपस्थित राहून सामाजिक एकोपा व सद्भावना याचा परिचय द्यावा व जिजाऊ रथयात्रेचे भव्य स्वागत घडवून आणावे, असे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड बल्लारपूर बल्लारपूर तर्फे करण्यात येत आहे.
– मनोहर माडेकर, कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ, चंद्रपूर
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page