श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग अंतर्गत समाज कल्याण विभाग चंद्रपुर द्वारे देण्यात येणारा राजश्री छत्रपति शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार केजीएन पब्लिक स्कूल और जूनियर कॉलेज, बल्लारपुर येथील वर्ग दहावी ची विद्यार्थी संबोधि दुर्गे हिला मिळाला असुन पुरस्कार राशि रुपए 5000/- चे धनादेश संबोधि दुर्गे हिला प्रदान करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक शेख महमूद, प्रिंसिपल सुजाता करमनकर, वाइस प्रिंसिपल सीमा माकड़े नी अभिनंदन केले.