Monday, September 14, 2026
spot_img
HomeParbhaniप्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तनिष्का तेलभरेची "इस्रो युविका वैज्ञानिक कार्यक्रम 2025" साठी निवड.

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तनिष्का तेलभरेची “इस्रो युविका वैज्ञानिक कार्यक्रम 2025” साठी निवड.

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तनिष्का तेलभरेची “इस्रो युविका वैज्ञानिक कार्यक्रम 2025” साठी निवड.

श्रेयश वानखेडे:
प्रिन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का तेलभारे वर्ग 9 वी हिची भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) आयोजित युवा वैज्ञानिक कार्यक्रम (YUVIKA) 2025 साठी निवड झाली आहे. ISRO दरवर्षी देशभरातील हुशार आणि विज्ञानामध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना “युविका” कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण देतो. या वर्षीही देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. महाराष्ट्र राज्यातून केवळ दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामधून तनिष्काची निवड होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. तनिष्काच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, शाळेचे प्रिंसिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे,सर्व शिक्षकवृंद यांच्या कडून तिचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.प्रिन्स इंग्लिश स्कूलला तिच्या या यशाचा अभिमान असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page