नागपूर विभागातील शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर एसआयटी गठीत करावी.- आ. संदिप जोशी
श्रेयश वानखेडे:
नागपूर विभागातील शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर SIT गठित करून चौकशी करण्याबाबत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मध्य नागपूर चे आमदार श्री. प्रवीणजी दटके सुध्दा उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये गंभीर गैरप्रकार, अपारदर्शक निर्णय व नियमबाह्य नेमणुकीचे प्रकार समोर आले आहेत.
या प्रक्रियेमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असून, खासगी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालक व अन्य कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट शाळांना मान्यता दिली गेली आहे.
सदर प्रकार अत्यंत गंभीर असून, शिक्षण क्षेत्रातील विश्वासाला तडा गालवणारा आहे. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे विशेष तपास पथक (SIT) गठित करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक व नीतिमत्तेच्या चौकटीत भरती प्रक्रिया होण्यासाठी आमचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील.