पर्यावरण वाहिनी द्वारा बल्लारपूर येथे पक्षी जलपात्र वाटप
श्रेयश वानखेडे:
दिनांक 20/04/2025 रोजी पर्यावरण वाहिनी द्वारा बल्लारपूर पोलीस स्टेशन तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे पक्षी जल पात्र चे वाटप करण्यात आले. दरवर्षी उन्हाळ्यात पक्षांना पाणी मिळत नाही. त्यामुळे लोकसहभाग व जनजागृती करून प्रत्येक वार्डात तसेच सार्वजनिक महत्त्वाचे ठिकाणी पर्यावरण वाहिनी द्वारे निशुल्क पक्षी जलपात्रचे वाटप करण्यात येते. बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे जलपात्रचे वाटप करण्यात आले. यावेळी एपीआय अंबादास टोपले, साळुंखे, श्रीकांत मेंढे, राहुल चांदेकर व इतर पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले यांनी पक्षांना वाचवण्यासाठी पर्यावरण वाहिनीचे तर्फे जलपात्र वाटप केल्याने समाज जागृती होईल व पक्षी वाचतील असा विश्वास व्यक्त केला व स्वतःच्या हस्ते एका जलपात्रात पाणी भरून लगेच पोलीस स्टेशनच्या एका झाडावर ते ठेवले. यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित डॉक्टर्स व कर्मचारी यांना जलपात्र वाटप करण्यात आले यावेळी डॉ. पिंपळशेंडे, डॉ. प्राजक्ता बावनकर डॉ. पल्लवी भगत, डॉ. कल्याणी कांबळे, डॉ. संदीप घोरमोडे व इतर डॉक्टर्स नर्सेस व इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर्सनी पक्ष्यांचे प्राण वाचवण्यासाठी पाणी आवश्यक आहे व ते पर्यावरण वाहिनीच्या माध्यमातून जलपात्र वाटून पूर्ण करण्यात येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी मोहम्मद शरीफ यांनी शहरातील नागरिकांनी पर्यावरण संरक्षण करणे तसेच मोठ्या प्रमाणावर स्वेच्छेने झाडे लावण्याचे, पशु ,पक्षांना पाण्याची सोय करण्याची, कचऱ्याची योग्य वर्गीकरण करून विलेवाट करण्याचे व शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. पर्यावरण वाहिनी च्या या उपक्रमात संस्था अध्यक्ष मोहम्मद शरीफ, उपाध्यक्ष विनायकराव साळवे, सचिव मनोहर माडेकर, संस्थापक सदस्य सतीश गोगुलवार, अजय अलोने, सुधीर कोरडे, मोहम्मद सलमान सर, राजू मारपल्लीवार, संजय श्रीवास्तव, अश्विनी मेश्राम, सपना रेवेली, सह्याद्री रेवाली, मोहम्मद अल्तमश आदींनी सहकार्य दिले.