Sunday, June 7, 2026
HomeSanghtanaपुण्यात 27 एप्रिलला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक
spot_img

पुण्यात 27 एप्रिलला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक

पुण्यात 27 एप्रिलला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक

श्रेयश वानखेडे:
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सातत्याने धरणे,  आंदोलने, अन्नत्याग आंदोलने  मोर्चे काढून सरकारवर दबाव वाढवून सरकार कडून विविध मागण्या मान्य करून घेतल्या व काही मागण्या प्रलंबित असून यावर विचार मंथन करणे तसेच महासंघाच्या संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यासाठी कार्यकारणी पदाधिकारी व  सभासदगण यांची 27 एप्रिल 2025 ला रोज रविवारला श्रमिक पत्रकार संघ, सदाशिव पेठ, पुणे येथे  सकाळी 10 ते दुपारी 1 वाजे पर्यंत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षते खाली  सभा आयोजित केली आहे. सभेत संघटनात्मक बाबीवर  चर्चा  आणि केंद्र व राज्य सरकारशी संबंधित प्रलंबित मागण्यांवर विचार विनिमय तसेच दिनांक 7 ऑगस्ट 2025 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे राष्ट्रीय महाअधिवेशन गोवा येथे सपन्न होणार आहे यावर चर्चा केली जाईल. सभेला राष्ट्रीय ओबीसी  महासंघ, महिला महासंघ, किसान महासंघ, युवा/युवती महासंघ, विध्यार्थी महासंघ, कर्मचारी महासंघ, वकील महासंघ सर्व पदाधिकारी व सभासदगण वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन  ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page