Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeParbhaniदुधना, करपरा व कसुरा नद्यांचे पुनर्रजीवन, खोलीकरण करावे.

दुधना, करपरा व कसुरा नद्यांचे पुनर्रजीवन, खोलीकरण करावे.

दुधना, करपरा व कसुरा नद्यांचे पुनर्रजीवन, खोलीकरण करावे.

सेलू तालुका दबाव  गटाची मागणी.

श्रेयश वानखेडे:

सेलू तालुक्यातील दुधना, करपरा व कसुरा नद्यांचे पुनर्रजीवन, खोलीकरण करण्यात यावेत  अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सेलू तालुका दबाव  गटाकडून एका निवेदनाद्वारे करण्यात  आली आहे.या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सेलू तालुक्यात दुधना, कसूरा व करपरा या महत्वाच्या नद्या आहेत. ज्यामध्ये केवळ पावसाळ्यातच पाणी असते. दुधना नदीवर ” लोअर दुधना धरण” बांधण्यात आलेले आहे.

उपरोक्त तीन ही नद्यांचे लाभ क्षेत्रात साधारणतः 20 ते 25 गावांचा सेलू तालुक्यातील समावेश आहे.गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने कमी होणारा पाऊस व बेसुमार वाळू उपसा यामुळे तीन ही नद्यांचे पात्र हे, असमान झालेले आहे. यातील करपरा नदीचे पात्र कोटी ठिकाणी आपोआप बदलले असून सर्व नद्यांचे पात्र हे अत्यंत उथळ झालेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात देखील या तीन नद्यांमध्ये पाणीसाठा होऊच शकत नाही. त्या सातत्याने अतिवृष्टी झाली की लगतच्या शेतीचे प्रचंड नुकसान होते. शेतकरी वर्ग, अत्यंत परेशान होतो. नाहक नुकसान झाल्याने प्रचंड प्रमाणात या नद्यांचे परिसरातील शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते.त्यामुळे या तीन ही नद्यांचे खोलीकरण करणे गरजेचे व आवश्यक आहे. त्यामुळे सदर नद्यांचे जवळील गावांना निश्चितच लाभ होणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. खोली करणासोबत सर्वेक्षण करून बंधारे करण्यात यावे. यासाठी तातडीने पाऊले उचलणे जरुरीचे आहे. ज्यामुळे तालुक्यातील दुधना, कर्पश व कसुरा या नद्यांचे क्षेत्रात येणाऱ्या जवळपास 60 ते 70 गावातील शेतकऱ्यांना भेट फायदा होईल. आपण या प्रकरणी तात्काळ सकारात्मक निर्णय करून जनतेस न्याय द्यावा अशीही मागणी सेलू तालुका दबाव  गट यांनी  केली आहे या निवेदनावर अँड.श्रीकांत वाईकर,ओमप्रकाश चव्हाळ, विकास गादेवार,गुलाब पौळ, योगेश सुर्यवंशी,लिबाजी कलाल, गणेश सोळंके,दिलीप मगर, देवराव दळवे,इसाक पटेल, सतिश काकडे, मुकुंद टेकाळे, दिलीप अगर परमेश्वर काढे, दत्ताराव कांगणे, रामचंद्र झाधाव, भारत खंदळे,अँड उमेश काष्टे, – नारायण पवार, उदव सोळंके, दिलीप शेवाळे, अजित मंडालीक – राजेंद्र केवारे, राजाभाऊ मोगल, लक्ष्मण प्रधान, गणपत मिटक मिटकरी, गणेश मुंढे, चंद्रकांत चौधरी, रोफ भाई, सुभाष काकडे, आबासाहेब भुजबळ,  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page