बल्लारशा तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारणी गठीत.
श्रेयश वानखेडे:
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्यकारणी च्या सभेत ठरल्यानुसार तालुका कार्यकारणी नव्याने गठीत करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने बल्लारपूर तालुका शहर व ग्रामीण कार्यकारणी नव्याने घोषित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपाध्यक्ष आनंद चलाख, सहकार्यवाह प्राचार्य असमा खान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माडेकर, प्राचार्य अनिल वागदरकर, तालुका अध्यक्ष निखारे, कार्यवाह महेश पानघाटे यांची उपस्थिती होती. निवडणूक निरीक्षक म्हणून आनंद चलाख यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी लोकशाही पद्धतीने नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. शहर कार्यकारिणीचे अध्यक्षपदी प्रकाश उरकुंडे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून रवींद्र अन्सुरी, उपाध्यक्षपदी पांडुरंग बोथले, देविदास कुबडे विशाल मडावी, सौ. सुनिता कांबळे, कार्यवाह म्हणून महेश पानघाटे, सहकार्यवाह म्हणून अमोल टोंगे, तुषार चौधरी, राघोबा आलाम, सुनिता कासरला, कोषाध्यक्ष दयानंद आमनर, संघटक म्हणून सतीश घुगुल, संजय ठोंबरे सल्लागार म्हणून प्राचार्य अनिल वागदरकर,राजू निखाडे, उमेश सोनवणे, पंकज मत्ते यांची निवड करण्यात आली.
तालुका ग्रामीण कार्यकारणी अध्यक्षपदी चंद्रकांत पावडे यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष म्हणून संदीप बोबडे यांची निवड करण्यात आली. इतर पदावर प्रदीप कन्नाके, लक्ष्मीकांत खाडे, अतुल नांदूरकर, सौ. विना चांदेकर, आशिष मोहितकर, किशोर पिंपळशेंडे, प्रमोद सीडाम, संदीप गौरकार, प्रतिमा वाकडे, श्रीकांत पोडे, गजानन शिरसागर, संतोष खाडे, मोहम्मद रफीक, ज्ञानेश्वर काटोले यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक आनंद चलाख, कार्यवाह दीपक धोपटे यांनी मार्गदर्शन केले. शहर व ग्रामीण कार्यकारिणीचे याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात कार्यक्रमाचे संचालन तालुका कार्यवाह महेश पानघाटे यांनी केले. प्रास्ताविक माडेकर सर यांनी केले.