Wednesday, July 29, 2026
HomeParbhaniविम्याची शंभर टक्के रक्कम मिळावी म्हणून सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.
spot_img

विम्याची शंभर टक्के रक्कम मिळावी म्हणून सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.

विम्याची शंभर टक्के रक्कम मिळावी म्हणून सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.

श्रेयश वानखेडे:
सेलू तालुक्यातील सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी विम्याची शंभर टक्के रक्कम मिळावी म्हणून तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार शिवाजी मगर साहेब यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, खरीप पीक विमा २०२४ अद्याप पर्यंत मिळाला नाही.यावर्षी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एका दिवसात तब्बल २५० मीमी पाऊसाची नोंद झाली यामुळे प्रचंड शेतीचे नुकसान झाले, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन त्याचे अनुदान सुद्धा दिले परंतु आय सी आय सी आय लोम्बार्ड कंपनी विमा देण्यासाठी टाळाटाळ करत आहे अग्रीम व उर्वरित ७५% रक्कम न दिल्यास मोठे जनआंदोलन करण्याचे इशारा सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी, रामेश्वर गाडेकर (सरपंच रायपुर) , प्रकाश आंधळे,  रामेश्वर शं.गाडेकर , दिलीप काकडे, बाबासाहेब गाडेकर, विठ्ठल गाडेकर, कल्याण गाडेकर, रघुनाथ टाके, तुकाराम उन्डे आदी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page