ज्योत्स्ना वानखेडे:
3 जानेवारी हा क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचा जयंतीदिन. या निमित्याने भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिति बल्लारपुर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातिला आदर्शांची पूजा आणि प्रतिमांना माल्यार्पण आणि अभिवादन केल्या गेले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या आयु. प्रकृतिताई पाटिल मॅडम यांनी “फुले सावित्रीचा शैक्षणिक दृष्टिकोण आणि आजची शैक्षणिक स्थिति” या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन केले. धम्ममित्र भास्कर भगत यांनी “क्रांति प्रतिक्रान्ति आणि चळवळीपुढील आव्हाने” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित नगरसेवक पवन मेश्राम यांनी नगर परिषदेच्या शाळा अद्ययावत करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल असा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन सोनू खोबरागड़े यांनी, प्रास्ताविक वनिताताई नगराले यांनी तर आभार प्रदर्शन रसिकाताई वाघमारे यांनी केले. निता कोरडे यांनी एक सुंदर गीत सादर केले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाली परीक्षाचे प्रमाणपत्र ही प्रसंगी वितरित करण्यात आले.