पाली बुद्ध विहार द्वारा बुद्धजयंती समारोह आयोजित
श्रेयश वानखेडे:
दर वर्षी प्रमाणे या वर्षीही भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती तर्फे बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ११ मे २०२५ ला सायं. ठीक ७.०० वाजता “अंगुलिमालाची धम्मदीक्षा” ही लघुनाटिका आशु वनकर आणि सहकारी सादर करनार आहेत. प्राध्यापिका नुतन माळवी, वर्धा यांचे “२१व्या शतकात बौद्ध धम्मापुढ़िल आव्हाने आणि पुढील वाटचाल” या विषयावर मार्गदर्शन होनार आहे. तसेच सोमवार दिनांक १२ में २०२५ ला पहाटे ५.३० वाजता “पाखरे निळ्या नभाचे” म्यूजिकल ग्रुप अमरावती प्रस्तुत *बुद्धपहाट* या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम बुद्ध विहारासमोरिल भव्य पटांगणावर संपन्न होनार आहे. उपरोक्त आयोजित दोन्ही कार्यक्रमाला मोठ्या संख्याने उपस्थित रहावे असे आव्हान तुलसीदास खैरे, प्रकाश देवगडे, अंबादास मानकर, गोकुल वाघमारे यांनी केले आहे.