Sunday, April 19, 2026
HomeChandrapurआगामी पावसाळा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापना संदर्भात उत्तम नियोजन करावे
spot_img

आगामी पावसाळा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापना संदर्भात उत्तम नियोजन करावे

आगामी पावसाळा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापना संदर्भात उत्तम नियोजन करावे

Shreyash Wankhede: पावसाळा अगदी तोंडावर आला असताना पुर परिस्थितीचा सामना करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन (Disaster Managemant) ला लागणारे साहित्य व मनुष्य बळाची वाढ व उत्तम नियोजन करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
समोर पावसाळयाचे दिवसात चंद्रपूर जिल्हयाची परिस्थिती बघता शहरातील ईरई नदी, झरपट नदी व वर्धा नदी या नदयांच्या पाण्यामुळे या वर्षी देखील पुर परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टी झाल्यास चंद्रपुरातील नदीकाठा लगतची वसाहती व सखल भागात पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्यामुळे शहरातील नाले आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा या मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून योग्यरीत्या पावसाळ्यापूर्वीच स्वच्छ करून त्या पद्धतीने नियोजन करावे अशी चर्चाही यावेळी राहुल पावडे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी केली व तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात असा आग्रह केला. या वर्षीसुध्दा पाऊस जास्त येण्याचे अनुमान आहे. त्यामुळे पावसाळ्‌या आधी सर्व सोयीयुक्त साहीत्य आपत्ती व्यवस्थापन पथकाकडे उपलब्ध होणे गारजेचे आहे. त्याचप्रमाणे स्वयं सेवकाची यादी बनवुन त्याची मदत पुर पिडीत अपातकालीन परिस्थितीमध्ये सुध्दा घेण्यात येऊ शकते. करीता पावसाळा पुर्व नियोजन म्हणुन शहरातील नागरीकांच्या मदती करीता सर्व सोयीयुक्त साहित्य (बोट/नाव) सुसज्ज करून आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे, करीता भाजपा तर्फे निवेदन राहुल बा. पावडे जिल्हाध्यक्ष भाजपा महनगर, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.
यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह भाजपा नेते रामपाल सिंग, प्रज्वल कडू, सुरज पेदुलवार, सविता कांबळे, संदिप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, दिनकर सोमलकर, चांद सय्यद, शिला चव्हाण, मायाताई उईके,अजय सरकार, चंद्रकला सोयाय,अशा आबोजवार, जयश्री जुमडे, शितल आत्राम, प्रलय सरकार, रणजीत डवरे, सुनिल डोंगरे प्रमोद शिरसागर, महेश जिटे, मनीषा महातव, संजय निखारे,अमोल मते, यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी यांनी भाजप शिष्टमंडळाला या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page