Monday, April 20, 2026
HomeChandrapur10 वी व 12 वी परीक्षेत अव्वल आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयातर्फे...
spot_img

10 वी व 12 वी परीक्षेत अव्वल आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयातर्फे सत्कार

10 वी व 12 वी परीक्षेत अव्वल आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयातर्फे सत्कार

चंद्रपूर( जीमाका) :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 8 शासकीय, 24 अनुदानित व 1 एकलव्य आश्रम  शाळा चालविल्या जातात.  शैक्षणिक सत्र 2025 पासून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी, संपूर्ण प्रकल्पातील शासकीय/ अनुदानित/एकलव्य आश्रम शाळेतुन इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत आलेल्य पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे,

त्या अनुषंगाने प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथे नुकताच विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर प्रमुख अतिथी म्हणून गिरीश पोळ (सहा, प्रकल्प अधिकारी), राजीव बोंगिरवार (सहा प्रकल्प अधिकारी), राजेश धोटकर (सहा. प्रकल्प अधिकारी), कार्यालयातील सर्व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार म्हणाले, बोर्डाच्या परिक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रथमच सत्कार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी प्रकल्पात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना 10 व 12 वी नंतर करीअर निवडीचे मार्गदर्शन केले.

इयत्ता 10 वी तील गुणवंत विद्यार्थी : 1) शितल भुजंगराव कन्नाके, प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, राजुरा) 2) सानिया छबिलदास सिडाम द्वितीय (अनुदानित आश्रम शाळा, राजुरा), 3) आराधना अनिल कुंभरे तृतीय (अनुदानित आश्रम शाळा, सरडपार)

इयत्ता 12 वी (विज्ञान) मधील गुणवंत विद्यार्थी : 1) अमन दिपक कोडापे- प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, भारी 2) दिपाली कैलास येरमे – द्वितीय (अनुदानित आश्रम शाळा, गडचांदूर)

इयत्ता 12 वी (कला) मधील गुणवंत विद्यार्थी : 1) सुशिला विजय गावडे ,प्रथम (अनुदानित आश्रम शाळा, सरडपार) 2) विद्या सुर्यभान आत्राम,द्वितीय (शासकीय आश्रम शाळा, देवाडा)

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page