Thursday, April 16, 2026
HomeParbhaniसाईबाबा नागरी सहकारी बँकेचा 421 कोटीचा विक्रमी व्यवसाय.
spot_img

साईबाबा नागरी सहकारी बँकेचा 421 कोटीचा विक्रमी व्यवसाय.

साईबाबा नागरी सहकारी बँकेचा 421 कोटीचा विक्रमी व्यवसाय.

2.25 कोटीचा निव्वळ नफा; सभासदांच्या विश्वासाला यशाची जोड.

ज्योत्स्ना वानखेडे: परभणी जिल्ह्यातील आग्रहण्य सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलू यांनी आर्थिक वर्ष 2025 – 26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवत 421 कोटीचा व्यवसाय केला आहे. बँकेने यावर्षी 2.25 कोटी रुपयाचा निव्वळ नफा मिळवला आहे. साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलू यांनी तीस वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आर्थिक वर्ष 2025 – 26 मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. 31 मार्च 2026 अखेर बँकेचा एकूण व्यवसाय 421.22 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार ठेवीची रक्कम मागील वर्षीच्या 236.52 कोटी रुपयांवरून वाढवून 267.22 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. तसेच कर्ज व आग्रीम रकमेचा आकडा 154 कोटी रुपयांपर्यंत विस्तारला आहे. नफा क्षमतेच्या बाबतीतही बँकेने चांगली कामगिरी करत 3. 93 कोटी रुपयाचा ढोबळ नफा कमवला असून सर्व तरतुदी नंतर निव्वळ नफा 2.25  कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेचे भाग भांडवल 7.22 कोटी रुपये असून राखीव व इतर निधी 18 . 48 कोटी रुपये इतका आहे. बँकेच्या आर्थिक आरोग्याचा महत्त्वाचा निर्देशक मानला जाणारा निव्वळ एनपीए केवळ एक टक्क्यावर आणण्यात बँकेला यश आले आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. संस्थापक अध्यक्ष हेमंतराव मुरलीधरराव आढळकर यांच्या मार्गदर्शना खाली बँक परभणी सह जालना, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. सध्या बँकेच्या सात शाखा आणि चार एटीएम केंद्राद्वारे ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा पुरवण्यात येत आहे बँकेच्या यशाबद्दल संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने सभासद ठेवीदार आणि कर्जदारांचे आभार मानले असून भविष्यात ही अधिक चांगली सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page