Saturday, May 2, 2026
HomeParbhaniसात जुनला सेलूत कविता मिरगाच्या काव्य मैफिल.
spot_img

सात जुनला सेलूत कविता मिरगाच्या काव्य मैफिल.

सात जुनला सेलूत कविता मिरगाच्या काव्य मैफिल.

शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम.
श्रेयश वानखेडे: येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे संचलित स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ( दि. ०७ ) जुन रोजी शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता कविता मिरगाच्या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कविता मिरगाच्या काव्य मैफिलीचे हे बारावे वर्षे असून या वर्षी काव्य मैफिलीत कवी ललित अधाने ( छत्रपती संभाजीनगर ), सुनिल उबाळे ( छत्रपती संभाजी नगर ), प्रिया धारूरकर ( छत्रपती संभाजीनगर ), सारिका उबाळे ( अमरावती ) हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. तर कवी संमेलनाचे सुत्रसंचलन गझलकार अरविंद सगर ( परभणी ) हे करतील. कवी संमेलन यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, महेश खारकर, यांच्या मार्गदर्शनात चंद्रशेखर मुळावेकर, डॉ. अशोक पाठक, रमेश नखाते, डॉ. सतीश मगर, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, सुभाष मोहकरे,रामराव बोबडे, रामराव गायकवाड, माधव गव्हाणे, संध्या फुलपगार, अनंत मोगल परिश्रम घेत आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page