Tuesday, May 5, 2026
HomeMaharashtraस्वातंत्र्य सेनानींच्या दरमहा २० हजार रूपये सन्मान निधीला कॅबिनेटची मंजुरी
spot_img

स्वातंत्र्य सेनानींच्या दरमहा २० हजार रूपये सन्मान निधीला कॅबिनेटची मंजुरी

स्वातंत्र्य सेनानींच्या दरमहा २० हजार रूपये सन्मान निधीला कॅबिनेटची मंजुरी

आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत वेधले होते लक्ष
४ हजार १०३ लोकतंत्र सेनानींना न्याय मिळवून दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांचे मानले आभार
राजस्थान सरकारच्या धर्तीवर मानधन वाढविण्याची मुख्यमंत्र्याकडे केली होती मागणी
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार


Shreyash Wankhede: आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ “राष्ट्र सर्वोपरी” म्हणून देशासाठी कारावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींना दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी मिळावा, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज बुलंद केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनाही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती. आज राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले, या शब्दांत लोकतंत्र सेनानींनी त्यांचे आभार मानले आहेत.

एका अत्यंत संवेदनशील विषयामध्ये स्वतः लक्ष घालून आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर ४ हजार १०३ लोकतंत्र सेनानींना न्याय मिळाला आहे. त्यामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

कॅबिनेटने दिलेल्या मंजुरीनुसार, एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या आणीबाणीतील सेनानींना मासिक २० रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला किंवा पतीला १० हजार रुपये इतके मानधन देण्यात येईल. तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या आणीबाणीतील सेनानींना मासिक १० हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला किंवा पतीला ५ हजार रुपये इतके मानधन देण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.

लोकतंत्र सेनानींना मानधन मिळण्यात व इतर प्रशासकीय बाबींमध्ये येत असलेल्या अडचणींचे निवेदन आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना दिले होते. विषयाची दखल घेऊन सरकारदरबारी पोहोचविल्यानंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. मंगळवार, दि. १७ जूनला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यामुळे या प्रयत्नांना यश आलं आहे. लोकतंत्र सेनानी संघाचे (जालना, परतूर) कार्याध्यक्ष रघुनाथ दीक्षित, महासचिव विश्वास कुलकर्णी (जळगाव), प्रदीप ओगले (सांगली),  अरुण भिसे (यवतमाळ), पांडुरंग जिंजुर्डे (यवतमाळ) आणि यादवराव गहूकार (यवतमाळ) , श्रीकांत शिंदे ( सांगली) यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत यासंदर्भातील निवेदन दिले होते.

राजस्थान सरकारचा दिला होता दाखला
लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधित भरीव वाढ करण्याची मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. आ. श्री. मुनगंटीवार यांनी निवेदनामध्ये राजस्थान सरकारच्या निर्णयाचा दाखला दिला होता. राजस्थान सरकारने लोकतंत्र सेनानी सन्मान म्हणून पेन्शन राशी २० हजार रुपये केली आहे. तसेच आरोग्य चिकित्सा सहाय्य म्हणून ४ हजार रुपयांची राशी दर महिन्याला तेथे दिली जाते. महाराष्ट्रात सध्यस्थितीत ४ हजार १०३ स्वातंत्र्य सेनानी सन्मान निधीस पात्र आहेत. राजस्थान सरकारची अधिसूचना लक्षात घेऊन महाराष्ट्रात देखील हा सन्मान निधी वाढवावा, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

विधानसभेत लक्षवेधीवर मांडली चर्चा
विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून आ. श्री. मुनगंटीवार यांनी चर्चा सुरू केली. त्यानंतर चर्चेत विविध मतदारसंघांच्या आमदारांनी सहभागी होणे तसेच हा मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देणे, हे केवळ आ. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे शक्य झाले होते. तसेच आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते, हे विशेष.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page